Nursery Child Shoot Third Standard Kid | नर्सरीत शिकणारा मुलगा बॅगेत बंदूक घेऊन गेला; तिसरीच्या मुलावर फायरींग

पटणा : Nursery Child Shoot Third Standard Kid | बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथे लालपट्टी शाळेत नर्सरीत शिकणारा मुलगा बॅगेत बंदूक घेऊन गेला तसेच त्याने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत विद्यार्थ्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. जखमी मुलाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
घडलेल्या या प्रकारामुळे शाळेत खळबळ उडाली आहे. घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरु केला असून नर्सरीतील मुलाकडे बंदूक कोठून आली याची चौकशी पोलीस करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्यांचे वडील याच शाळेत रक्षकाचं काम करत होते. ही घटना शाळेतील प्रार्थनेच्या अगोदर घडली आहे.
जखमी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील मुख्याध्यापकांनी मुलाला गोळी लागल्याचे कळवले. मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे तुम्ही लवकर या असा निरोप शाळेने पालकांना दिला. आरोपी मुलाच्या वडिलांना ही माहिती कळताच ते तातडीने शाळेत पोहचले आणि मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेली बंदूक आणि मुलाला घेऊन शाळेतून फरार झाले. त्यांनी सोबत आणलेली बाईक शाळेतच सोडली.
दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे पीडित मुलाच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. एक छोटा चिमुकला हा गोळी चालवू शकतो त्यावर पालकांचा विश्वासच बसत नाही. आरोपीच्या आई वडिलांचीही चौकशी करा असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. (Nursery Child Shoot Third Standard Kid)
नर्सरीच्या विद्यार्थ्याने १० वर्षीय मुलावर गोळी चालवली, जो शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत होता.
गोळी त्याच्या डाव्या पायाला लागली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे.
अखेर नर्सरीच्या मुलाच्या हातात बंदूक कशी आली याची चौकशी आम्ही करत आहोत.
आम्ही जिल्हाभरातील शाळांमधील मुलांच्या बॅगा नियमित तपासाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत
असे पोलीस अधीक्षक शैशव यादव यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”
UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार