Pune Pimpri Chinchwad Crime News | परदेशी कंपनीचा डुप्लिकेट माल बनतोय पिंपरीमध्ये ! पिंपरी पोलिसांची कारवाई, 27 लाखांचा माल हस्तगत

Duplicate goods of a foreign company

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लोराअ‍ॅक्टीव्ह या परदेशी कंपनीचा शॅम्पो, कंडिशनर, डब्ल्यु वन नॅनोप्लॉस्टिक ट्रीटमेंट तसेच तसेच लक्स लीझ केरेटीन केंन्डिशनल, शॅम्पो यांची ही उत्पादने कॉपीराईट कायद्याचा भंग करुन बनावट तयार करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) २७ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

https://www.instagram.com/reel/C-HpyVxJ8YK/?utm_source=ig_web_copy_link

याबाबत संदिप हरीष गिडवानी (वय ४१, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुकानमालक विरेंद्र रामलखन यादव Virendra Ramlakhan Yadav (वय ४०, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरीतील रिव्हर रोडवरील (River Road Pimpri) क्रिष्णा कॉसमेटीक (Krishna Cosmetic) या दुकानात गुरुवारी सायंकाळी करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिमेर्स नावाच्या कंपनीत कामाला आहेत. कंपनीकडे असलेल्या कॉपीराईट व ट्रेडमार्कचा कोणी भंग करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. पिंपरीतील क्रिष्णा कॉसमेटिक कंपनीमध्ये फ्लोराअ‍ॅक्टीव्ह या परदेशी कंपनीच्या व लक्स लीस या कंपनीची बनावट उत्पादने तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी याची माहिती पिंपरी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे व तपास पथकातील पोलिसांनी या दुकानावर छाप घातला. त्यात फ्लोरोअ‍ॅक्टीव्ह डब्ल्यु वन शॅम्पो, फ्लोअ‍ॅक्टीव्ह डब्ल्यु वन कंपनीचे थ्री इन वन केंडीशनर, नॅनोप्लॉस्टिक ट्रीटमेंट बॉक्स, लक्स लीझ केरेटीन शॅम्पो, लक्स लीझ केरेटीन ट्रीटमेंट बॉक्स, लक्स लीझ केरेटीन कॅन्डीशनल, फ्लोराअ‍ॅक्टीव्ह कंपनीचे स्टीकर असलेल्या रिकाम्या बाटल्या, लक्स लीझ कंपनीचे स्टीकर असलेल्या बाटल्या, दोन्ही कंपनीचे बनावट स्टीकर असलेल्या ७ पेपर शीट, बनावट बारकोड असलेल्या २ पेपर शीट असा २७ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा माल पकडण्यात आला. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे (PI Dhananjay Kapre) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली