Pune ACB Demand Case | तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी मागितली 5 लाखांची लाच; लोणीकंदच्या एपीआयवर गुन्हा दाखल
पुणे : Pune ACB Demand Case | बनावट कागदपत्रे (Fake Documents) दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Demand Of Bribe). याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले API Chetan Chandrakant Thorbole (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Demand Case)
याबाबत एका ३२ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार करणारा अर्ज लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल होता. त्याचा तपास वाघोली पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले याच्याकडे होता. या तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी चेतन थोरबोले याने ५ लाख रुपयांची लाच मागितली. (Pune Bribe Case)
अगोदरच या तक्रार अर्जामुळे नोकरी गेली असताना आणखी ५ लाख रुपयांची लाच मागत असल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची १, ४, ११ व २४ जुलै रोजी पडताळणी केली. या पडताळणीवेळी थोरबोले याने तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
परंतु, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही.
मात्र लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर बुधवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर