Sangamner Assembly Election 2024 | सुजय विखेंची विधानसभा लढवण्याची इच्छा; बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची चर्चा
नगर: Sangamner Assembly Election 2024 | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पराभवाचा धक्का बसल्यानंतर माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरु केलेल्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) अशी लढत होऊ शकते. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. (Sangamner Assembly Election 2024)
जिल्ह्यातील राजकारणात विखे-थोरात यांचं नातं विळ्या-भोपळ्याचं सर्वश्रुत आहे. कॉंग्रेसमध्ये एकत्र असतानाही हा संघर्ष असाच होता. त्यानंतर विखेंनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आता हा संघर्ष अधिकच वाढला आहे. सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. तसेच जनतेनं ठरवलं तर निवडणूक लढण्यास तयार असल्याचे विखे यांनी सांगितले.
संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात आमदार असल्यानं थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची चर्चा आहे. तर राहुरी विधानसभा (Rahuri Assembly Constituency) लढल्यास प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) विरुद्ध सुजय विखे अशी लढत होऊ शकते.
संगमनेर विधानसभा मतदारसंघावर बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे.
१९८५ पासून २०१९ पर्यंत असे सलग आठ वेळा ते संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Govt) त्यांनी महसूल मंत्रालयाची धुराही सांभाळली होती. त्यामुळे सुजय विखेंसाठी हे आव्हान तितकेसे सोपे असणार नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर