Chhatrapati Sambhaji Nagar Crime | ‘ माझ्याशी बोल, मला भेट, नाहीतर मी डीपीवर चढेन’! ; तरुणाच्या धमक्यांना कंटाळून तरुणीची गळफास घेत आत्महत्या
संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime | बीएचएमएसचे (BHMS Girl Suicide) शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. ‘तू माझ्याशी बोल, मला भेटली नाही तर मी विद्युत डीपीवर चढून जीव देईन’, अशी धमकी तरुणाने दिल्याने त्यातूनच तरुणीने गळफास घेत आयुष्य संपवले आहे.
ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील एन ५ सिडको भागात असलेल्या हॉस्टेलमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गायत्री बाबासाहेब दाभाडे (वय २१ वर्ष रा. संतोषी माता नगर वैजापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. तर दत्तू बाबासाहेब गायके (रा.जानेफळ, ता-वैजापूर) असे एकतर्फी प्रेमातून धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
गायत्रीची मावशी कल्पना गजानन सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की , गायत्री सिडको एन ५ भागातील विजयश्री कॉलनीतील होस्टेलमध्ये राहून बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. यावेळी आरोपी दत्तू हा गावातील असून त्याने गायत्रीला वारंवार फोन करून त्रास दिला होता. तू माझ्याशी फोनवर बोल, तू मला भेटली नाही तर मी विद्युत डीपीवर चढून माझं आयुष्य संपवेन, अशा धमक्या तो देत होता.
दत्तूच्या सततच्या त्रासाला कंटाळून गायत्रीने हॉस्टेलमधील फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन
आयुष्य संपवलं. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यामध्ये दत्तू गायके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तेलुरे करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर