How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई, कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Heavy Rain Floods

नवी दिल्ली – How To Get Compensation | नेहमी शहरातील खालच्या भागातील वस्त्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान होते, जिथे स्थानिक प्रशासन गरीब लोकांना नुकसान भरपाईचे वाटप करते. प्रश्न असा आहे की, जर पावसात घर-दुकानाचे अथवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले तर सरकारकडे भरपाईसाठी मागणी कशी करावी. यासाठी एक पद्धत असते, पाऊस आणि पुरामुळे सामान्य लोकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रशासन काही नियम ठरवते. (Floods And Rains)

जिल्हा प्रशासनाची जबाबदारी

कोणत्याही राज्यात पाऊस-पुरामुळे अथवा इतर नैसर्गिक संकटामुळे होणार्‍या नुकसानीचा अंदाज घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते. जिल्हा कलेक्टर, नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून घेतात आणि नंतर त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवतात.

कुठे मागावी मदत

  • पावसामुळे घर अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित महापालिका,
    नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीमध्ये याबाबत माहिती द्या.
  • सामान्यपणे स्थानिक प्रशासन शहर अथवा गावात पाऊस-पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे
    करण्याची सूचना देते. यामध्ये सरकारी अधिकारी-कर्मचारी, प्रत्येक कुटुंबाकडून मालमत्ता आणि जिविताशी संबंधीत नुकसानीबाबत विचारतात आणि त्याची माहिती गोळा करतात.
  • सर्वेदरम्यान सरकारी कर्मचारी पुरामुळे प्रभावित परिसराचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा बनवतात आणि ते जिल्हा प्रशासनाला पाठवतात. जिल्हा प्रशासन यासंबंधीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवते.
  • यानंतर राज्य सरकारकडून मदतीचे पॅकेज म्हणून मिळालेली रक्कम पीडित कुटुंबाना वाटप केली जाते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा, डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’

You may have missed