Kondhwa Pune Crime News | ‘आम्ही इथले भाई म्हणत’ गाड्या फोडत अल्पवयीन मुलांनी माजवली कोंढव्यात दहशत

Kondhwa Police

पुणे : Kondhwa Pune Crime News | रस्त्याकडेला लावलेल्या कार, दुचाकी यांच्या काचा फोडत अल्पवयीन मुलांनी कोंढव्यात दहशत माजवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Vandalism of Vehicles)

याबात खडक बहादूर बिस्टा (वय ४९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर सलीम शेख (वय २१, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), अमर अकबर शेख (वय १९, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) व त्यांच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोेंढव्यातील शिवनेरीनगरमधील (Shivneri Nagar Kondhwa) गल्ली नंबर ३६ मध्ये बुधवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतरांनी त्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्या होत्या.
अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी आरडा ओरडा करत हातात कोयते, लोखंडी हत्यार घेऊन ते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे बोलत दहशत पसरविली. फिर्यादी यांची कार, संतोष भगवान चव्हाण यांची कार, बाळासाहेब दत्तात्रय जाधव यांची कार तसेच मुन्नाराम चौधरी यांच्या २ मोटारसायकली अशा वाहनांवर हातातील कोयते मारुन काचा फोडल्या.

मोटारसायकलीची हेडलाईट व मडगार्ड तोडून फोडून नुकसान केले.
पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’

You may have missed