Warje Malwadi Pune Crime News | ‘मित्राला कशाला मारता’ बारमध्ये झालेल्या वादातून तरुणाला चौघांनी मारहाण करुन केले जखमी; वारजे माळवाडीतील घटना

marhan

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | चांदणी बारमध्ये (Chandni Bar Warje) ‘मित्राला कशाला मारता’ असे विचारल्याने चौघा जणांनी तरुणावर धारदार वस्तूने मारहाण (Marhan) करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत गौरव बाळासाहेब लोंढे (वय ३८, रा. लोंढेवाडा, कोथरुड – Londhw Wada Kothrud) यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital) दाखल केले असून वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली. त्यानुसार पोलिसांनी भूषण बोराटे व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हा कर्वेनगरमधील चांदणी बारच्या बाजूला रोडवर गुरुवारी पहाटे सव्वा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र मंदार मुळीक हे चांदणी बारमध्ये दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा भूषण बोराटे हा तेथे आला. त्याने मंदार मुळीक याचा गळा पकडला. म्हणून फिर्यादी यांनी त्यास गळा का पकडतो, असे विचारले. त्यावर त्याने तुझा काय संबंध मला विचारायचा, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. व तो आतमध्ये निघून गेला. त्यानंतर त्यांचा मित्र मंदार मुळीक हाही निघून गेला. त्यानंतर पहाटे एक वाजता फिर्यादी चांदणी बारमधून बाहेर पडले.

कर्वेनगरला घरी जात असताना भूषण बोराटे व त्याचे तीन मित्र आले.
बारमध्ये झालेल्या भाषणाचा राग मनात धरुन त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.
भूषण बोराटे याने हातातील धारदार वस्तूने त्यांच्या उजव्या हातावर वार केला.
त्याचवेळी त्यांचा मित्र विकी नलावडे व तुषार लोंढे तेथे आले.
त्यांनी जखमी अवस्थेत फिर्यादी यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणले.
तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस फौजदार निगडे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’

You may have missed