Pune Crime News | फिरणार्‍यासाठी गाड्या चोरणार्‍याकडून 11 दुचाकी जप्त ! कागदपत्रे नंतर देतो सांगून चोरीच्या गाड्या विकायचा, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

Bharti Vidyapeeth Police

पुणे : Pune Crime News | फिरणार्‍यासाठी दुचाकी गाड्या चोरुन त्या विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) पकडले. त्याच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

श्रावण माधव शिंदे Shravan Madhav Shinde (वय २६, रा. साईराम हाईटस, उबाळेनगर, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरात चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्यामुळे वरिष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चोरीस गेलेल्या दुचाकीसह एक जण फिरत आहे. आरोपीचा शोध घेत असताना सातारा रोडवरील (Pune Satara Road) भुयारी मार्गालगतचे लोखंडी पुलाजवळ संशयित श्रावण शिंदे मिळाला. त्याच्याकडील दुचाकी चोरीची होती. अधिक तपासात त्याने चोरलेल्या ६ लाख रुपयांच्या ११ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.

श्रावण शिंदे हा फिरण्यासाठी गाड्या चोरायचा. त्यानंतर गाड्यांसाठी ग्राहक शोधत फिरायचा. कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून त्याने एकाकडून ५ हजार रुपये घेऊन दुचाकी दिली होती. नंतर त्याने कागदपत्रे दिली नाही आणि बाकीचे पैसे घेण्यासाठी आला नाही. पोलीस जेव्हा शिंदे याला घेऊन त्याचा दारात गेले, तेव्हा त्याला ही गाडी चोरीची असल्याचे समजले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी (ACP Nandini Vagyani) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील (PI D.S. Patil), पोलीस निरीक्षक शरद झिने (Pi Sharad Zine),
सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम (API Sameer Kadam), पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, हनुमंत मासोळ, चेतन गोरे,
निलेश जमदाडे, सतिश मोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खेरमोडे,
धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, अभिनय चौधरी मितेश चोरमोले, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’

You may have missed