Kalyaninagar Porsche Accident Pune | कल्याणीनगर: पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत; पोलीस आयुक्तांची न्यायालयाकडे मागणी
पुणे : Kalyaninagar Porsche Accident Pune | कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी न्यायालायत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिली. पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे (Blood Sample Tampering Case) आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत.
त्यापैकी पोर्शे कार चालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे. तब्ब्ल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाईलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल इत्यादी महत्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) न्यायालयात सादर केले आहेत.
आता हे खटले जलदगतीने चालवण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवार (दि.१) स्पष्ट केले. (Kalyaninagar Porsche Accident Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना
How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर
Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती
RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना