Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

sharad pawar

अमरावती : Maharashtra Assembly Election 2024 | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आगामी विधानसभा निवडणूक मविआ मध्ये (Mahavikas Aghadi) राहूनच राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) लढणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या ९ ऑगस्ट पासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवनेरी किल्ल्यातून शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या मतदारसंघातून यात्रा जाईल, त्या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार देण्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीसाठी अनिल देशमुख अमरावतीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमच्या पक्षाची ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार असून तेथील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

त्याचप्रमाणे या यात्रेतून महायुती सरकारच्या कारभाराची माहिती ही जनतेला देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट किती मतदारसंघात उमेदवार देणार आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे नमूद करीत ते पुढे म्हणाले की, यात्रे दरम्यान होणाऱ्या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत किती जागा हव्यात ते स्पष्ट केले जाईल. तथापि ज्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे, ते मतदारसंघ आमच्या पक्षासाठी मागण्याची भूमिका पक्षाची असल्याचे ते म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

You may have missed