Chakan-Mahalunge Traffic Jam Issue | पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून चाकण व महाळुंगेमध्ये होणाऱ्या वाहतुक कोंडीची पाहणी; तात्काळ घेतली नियोजन आढावा बैठक

IPS Vinoy Kumar Choubey (2)

पिंपरी : Chakan-Mahalunge Traffic Jam Issue | पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी आज चाकण (Chakan Police Station) व महाळुंगे पोलीस ठाणेचे (Mahalunge Police Station) हद्दीमध्ये वाहतुक कोंडी (Chakan Traffic Jam) समस्या निवारण संदर्भात पाहणी करुन गॅब्रियल कंपनी, चाकण येथे संयुक्त वाहतुक नियोजन आढावा बैठक घेतली.

बैठकीकरिता आ. दिलीप मोहिते पाटील MLA Dilip Mohite Patil (खेड विधानसभा सदस्य – Khed Assembly) , नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे (NHAI) 05 अधिकारी, एमआयडीसी इंजिनियर, तहसीलदार खेड, गट विकास अधिकारी खेड, कार्यकारी अधिकारी चाकण नगरपरिषद, परिवहन वाहतुक आयुक्त व परिवहन वाहतुक निरीक्षक, पिंपरी चिंचवड मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रादेशिक विकास महामंडळाचे 03 अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, प्रकल्प अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, मा. खासदार शिरुर यांचे स्वीय सहायक, नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडीयाचे 02 कंत्राटदार, राज्य वाहतुक विभागाकडील 02 अधिकारी तसेच पोलीस उप-आयुक्त वाहतुक, पोलीस उप-आयुक्त परि.-3, सपोआ वाहतुक, सपोआ चाकण विभाग, पोलीस निरीक्षक वाहतुक, चाकण व महाळूंगे तसेच चाकण व महाळुगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि औद्योगिक विकास महामंडळ, खाजगी कंपन्यांचे एच.आर.ओ. इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये चाकण व महाळुंगे परिसरातील वाहतुक समस्यांचा आढावा घेवून सध्याची वाहतूक गर्दीची समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत तसेच इतर संबंधित विभागासोबत संयुक्त कार्यवाही करून समस्या निवारणाबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. (Chakan-Mahalunge Traffic Jam Issue)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

You may have missed