Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Malhar Peth Police Station

पाटण : Malhar Peth Police Station | आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो, तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच माहीत असतात. अशा ३ लाख ७३ हजार रुपये किमतीचे मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी अथक प्रयत्न करून चोरट्यांकडून मिळवून ते नागरिकांना परत केले आहेत. (Mobile Theft)

मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछाले (API Chetan Machale) यांनी नागरिकांचे हरविलेलया मोबाईलचा शोध घेण्यासाठी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या.

त्याअनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफने सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करुन अथक परीश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३ लाख ७३ हजार रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.

गुरुवार (दि.१) रोजी चेतन मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारपेठ पोलीस ठाणे याच्या हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांच्या मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहीम समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, आंचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, सविता गर्जे पोलीस उपअधिक्षक ,पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख (IPS Sameer Shaikh), आंचल दलाल (Aanchal Dalal) अप्पर पोलीस अधिक्षक सातारा,
सविता गर्जे (DySP Savita Garje), पोलीस उपअधिक्षक पाटण विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले,
पोलीस उपनिरीक्षक नितेश पोटे (PSI Nitesh Pote), पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ (PSI Ramrao Vetal),
पोलीस कॉन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केलेली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

You may have missed