Gold and Silver Rate | सोन्याने पुन्हा घेतला वेग, आता इतक्या किमतीला विकलं जातंय 22 आणि 24 कॅरेट गोल्ड; चांदीही चमकली

Gold

नवी दिल्ली : Gold and Silver Rate | देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. कारण अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, सोन्यावर लावली जाणारी कस्टम ड्यूटी खुप कमी केली आहे. ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या घसरणार्‍या भावावर दिसत होता, परंतु आता दर वाढत आहे. आज सुद्धा सोन्याच्या दरात उसळी दिसून आली आहे.

झारखंडची राजधानी रांचीच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,200 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 69,510 रुपये नोंदला गेला आहे. तर, चांदी प्रति किलो 91,700 रुपये दराने विकली जात आहे.

चांदीच्या दरात आज 700 रुपयांची वाढ
सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी म्हटले की, सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. प्रति किलो चांदीच्या दरात आज 700 रुपये वाढ झाली. आज चांदी प्रति किलो 91,700 रुपये दराने विकली जाईल. तर काल सायंकाळपर्यंत चांदी 91,000 रुपये दराने विकली गेली होती.

सोन्याच्या भावात उसळी
मनीष शर्मा यांनी सांगितले की, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम काल सायंकाळी 65,700 रुपयांना विकले गेले. आज सुद्धा त्याची किंमत 66,200 रुपये आहे. म्हणजे दरात 500 रुपयांची उसळी दिसून आली आहे. तर, गुरुवारी लोकांनी 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 68,990 रुपयांच्या दराने खरेदी केले. आज त्याची किंमत 69,510 रुपये आहे. म्हणजे दरात 520 रुपये वाढले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

You may have missed