Fastag New Rule | आता 3 वर्ष जुन्या फास्टॅगचे करावे लागेल KYC, 5 वर्षांचा बदलणे आवश्यक

Fastag

नवी दिल्ली : Fastag New Rule | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या महिन्यापासून म्हणजे एक ऑगस्टपासून फास्टॅगच्या नियमात बदल केला आहे. आता वर्ष जुन्या फास्टॅगचे केवायसी (FASTag KYC Update) करणे अनिवार्य केले आहे. सोबतच पाच वर्ष जुना फास्टॅग आता बदलावा लागेल. ही दोन्ही कामे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत करावी लागतील.

यानंतर ज्या फास्टॅगची केवायसी नसेल आणि जो पाच वर्ष जुना असेल, तो बंद ब्लॅकलिस्ट होईल. वाहन मालक फास्टॅगचे ऑनलाईन केवायसी अपडेट करू शकतात.

रजिस्ट्रेशन आणि चासी नंबरसोबत लिंक करा फास्टॅग

वाहन मालकांना आता आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन आणि चासी नंबरसोबत फास्टॅग लिंक करावा लागेल. नवीन वाहन खरेदी केल्याच्या 90 दिवसांच्या आत रजिस्ट्रेशन अपडेट करावे लागेल. फास्टॅग तुमच्या रजिस्टर्ड फोन नंबरसोबत जोडलेला असणे आवश्यक आहे. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत या सर्व महत्वाच्या गोष्टी अपडेट कराव्या लागतील.

ऑनलाईन केवायसी असे करा अपडेट

ऑनलाईन फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी वाहनाचे आरसी, आयडी प्रूफसाठी वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.

  • फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी IHMCL ची वेबसाईट fastag.ihmcl.com वर जा.
  • रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे वेबसाईटवर लॉगिन का. यानंतर ओटीपी आणि कॅप्चा नोंदवा.
  • एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यामध्ये My Profile वर क्लिक करा.
  • यानंतर आपले फास्टॅग केवायसी स्टेटस पाहू शकता.
  • यानंतर केवायसी सेक्शनवर जाऊन Customer Type वर क्लिक करा.
  • आता मागितलेले सर्व डिटेल्स डॉक्यूमेंट्ससह नोंदवा.
  • यानंतर फास्टॅग केवायसी अपडेट होईल.
  • याशिवाय तुमचे ज्या बँकेत अकाऊंट आहे, त्या बँकेत सुद्धा जाऊन फास्टॅग केवायसी अपडेट करू शकता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Gold and Silver Rate | सोन्याने पुन्हा घेतला वेग, आता इतक्या किमतीला विकलं जातंय 22 आणि 24 कॅरेट गोल्ड; चांदीही चमकली

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed