Kisan Samman Nidhi | ‘किसान सन्मान’ सारख्या मोफतच्या सरकारी योजना बंद होतील? बजेट बिघडण्याचा धोका, मोदी सरकारच्या मोठ्या अधिकार्याने दिला इशारा
जयपुर : Kisan Samman Nidhi | देशातील अनेक राज्यात मोफतच्या योजना चालवल्या जात आहेत. परंतु यामुळे राज्यांच्या बजेटला मोठा धोका आहे. 16 व्या वित्त आयोगाने या मुद्द्यावर विचार करण्यास सांगितले आहे. सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढीया (Arvind Panagariya) यांनी म्हटले की, वित्त आयोग आपल्या अहवालात विविध राज्य आणि केंद्राकडून चालवल्या जात असलेल्या मोफत योजनांवर विचार करणार आहे.
पनगढीया यांनी म्हटले की, विविध राज्य आणि कदाचित केंद्राद्वारे जे व्यक्तीगत लाभ दिले जात आहेत त्यांचा आर्थिक स्थितीवर खुप खोलवर परिणाम होतो. यासाठी वित्त आयोगाला हे सुद्धा पहायचे असते की, देशात व्यापक आर्थिक आणि वित्तीय स्थिरता कायम राहावी. यावर निश्चितपणे वित्त आयोग विचार करेल.
अरविंद पनगढीया यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, व्यक्तिगत लाभ प्रदान करणार्या योजना, ज्या विविध राज्य, आणि कदाचित केंद्राकडून सुद्धा दिल्या जातात, त्यांचा आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन आयोगाला हे सुद्धा पहायचे आहे की, देशात व्यापक आर्थिक आणि वित्तीय स्थिरता कायम रहावी. हे आमच्या अधिकार कक्षेत येते.
त्यांनी पुढे म्हटले की, यासाठी वित्त आयोग निश्चितपणे यावर विचार करेल. याबाबत आत्ताच काही बोलता येणार नाही.
यासाठी वेळ लागेल. त्या स्थितीत पोहचण्यासाठी सहा-सात महिने लागतील.
देशात 16वा वित्त आयोग गठित केल्यानंतर आयोग राज्यांच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करत आहे.
राज्य आणि केंद्र सरकारसोबत विचार विनिमय केल्यानंतर आयोग आपल्या शिफारसी सादर करेल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा