Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पैशांची नाही कमतरता, 3 महिन्यात जारी होतील 3 लाख कोटी रुपयांची कंत्राटे
नवी दिल्ली – Nitin Gadkari | रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी (Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी आपल्या क्षेत्राच्या विकासाबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. गडकरी यांनी म्हटले की, आगामी तीन महिन्यात कमीत कमी तीन लाख कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट जारी केली जातील. या आर्थिक वर्षात कमीत कमी पाच लाख रुपयांची कंत्राटे जारी केली जातील.
नितीन गडकरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमुळे आचार संहिता लागू झाली होती. ज्यामुळे या अर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रस्ते योजनांची गती मंदावली होती. परंतु, आगामी काळात यामध्ये तेजी दिसू शकते. कारण या क्षेत्रात तेजी आणण्यासाठी मोठे बजेट ठेवले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला की, ते रस्ते आणि परिवहनच्या वाढीसाठी लवकरच मोठी रक्कम जमविण्यात यशस्वी होती. त्यांनी सर्वांना आश्वासन दिले की, येत्या तीन महिन्यात जवळपास तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड विविध करारांच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतो. ज्याद्वारे ध्येयपूर्ती करण्यात यश मिळेल.
नितीन गडकरी म्हणाले, आमचे ध्येय आहे की 2025 च्या मार्च महिन्यापर्यंत पाच लाख कोटी रुपयांचे करार केले जावेत.
ज्यासाठी मंत्रालयाकडे अनेक रस्ते प्रकल्प आहेत. ज्यांच्यासाठी निधी जमविणे कोणतीही मोठी समस्या नाही.
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाची प्रतिष्ठा भांडवली बाजारात खुप जास्त आहे.
गडकरी यांनी म्हटले की, देशात वसूल करण्यात येत असलेल्या टोलमधून सुद्धा एनएचएआयच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
टोलमधून सध्या 45,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
हे उत्पन्न येत्या दोन वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल.
रस्ते मालमत्तांमधून सरकारला पैसे मिळत आहेत, ज्यामधून संसाधने जमविण्यास कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा