Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी
पुणेः Nashik Phata To Khed Elevated Corridor | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकाराने बहुप्रतिक्षित 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा- खेड (Nashik Phata To Khed) कॉरिडोर ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तब्बल 7 हजार 827 कोटी रुपये किमतीच्या 32 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह (Pimpri Chinchwad) चाकण औद्योगिक पट्ट्यातील (Chakan MIDC) प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम या निमित्ताने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे- चिखली- मोशी- भोसरी परिसरातील ‘ट्रॅफिक कोंडी’ कायमची सुटणार आहे. या कॉरिडॉरमुळे चिंचवडच्या आसपासची वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे.
पिंपरी- नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या 2 लेन सर्व्हिस रोडसह सध्याच्या रस्त्याचे 4/6 लेनमध्ये अपग्रेड केले जातील. याशिवाय 8 लेनचा उड्डाणपूल तयार केला जाईल.
” या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल. यामुळे या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता वाढेल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल.
हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क, टेक्सटाईल क्लस्टर्स, SEZ, फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स
आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रासह 10 आर्थिक नोड्सना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल,
ज्यामध्ये नऊ जंक्शन्स आणि सुलभ वाहतूकीसाठी दोन मोठे पूल समाविष्ट आहेत”,
अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा