Pune Congress | शहराध्यक्ष अरविंद शिंदेंना हटवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गाठली दिल्ली; मल्लिकार्जुन खरगेंशी खलबतं
पुणे : Pune Congress | लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. अशातच आता पुणे काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांना पदावरून हटवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. (Pune Congress)
पुण्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला या पराभवानंतर पुण्यातील काँग्रेस संघटनेमध्ये बदल करण्याची मागणी आता स्थानिक नेते करीत आहेत. मागेच या नेत्यांनी मुंबईत राज्यातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेत हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला होता. त्यानंतर आता या स्थानिक नेत्यांनी दिल्लीवारी केली आहे.
येणाऱ्या विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसला पुण्यामध्ये सक्षम करण्यासाठी तातडीने नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीनंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने काँग्रेस शिष्टमंडळाने थेट दिल्लीमध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांबाबत या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
तसेच राज्य सरकारविरोधात असलेल्या परिस्थितीचा कसा उपयोग करुन घेता येईल?
याबाबत चर्चा झाली असून पुण्यातील शहराध्यक्ष बदलावा याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे.
यावेळी पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्ष पदासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे. असं विचारलं असता माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचे नाव पुढे आल्याचेही सांगण्यात येत आहे.
माजी मंत्री, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे (Bagwe Ramesh ) यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ खरगे यांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळात रमेश अय्यर, चंदू कदम, जयंत किराड, नुरद्दीन इनामदार, विजय खळदकर, विशाल मलके, गौरव बोर्डे, यशराज पारखी, रामदास मारणे, गणेश जाधव, शानी नौशाद या काँग्रेसच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?