Pune BJP | भाजपचे कार्यकर्ते करणार वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदत – धीरज घाटे

Pune BJP

पुणे : Pune BJP | शहर भाजपचे 100 कार्यकर्ते आठवड्यातून एक दिवस शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना मदत करणार असल्याची माहिती शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी दिली.(Pune BJP)

पुण्यातील वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज भाजपच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil) आणि शहर वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांची भेट घेतली.

शहर भाजपचे सरचिटणीस वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर, बापू मानकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव सुशील मेंगडे, निवेदिता एकबोटे, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, नगरसेवक अजय खेडेकर, महेश गलांडे, प्रसन्ना दादा जगताप, हरिदास चरवड, उमेश गायकवाड, प्रल्हाद सायकर, मानसी देशपांडे, नगरसेविका नीलिमा खाडे, गायत्री खडके, मंजुषा नागपुरे, प्रियांका शेंडगे, प्रतीक देसरडा, प्रशांत सुर्वे, आनंद पाटील, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, गिरीश खत्री आदी या वेळी उपस्थित होते.

पुणे शहराच्या विविध भागातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या योजनांची माहिती पाटील यांनी यावेळी शिष्टमंडळाला सादरीकरणातून दिली. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आणि अन्य विभागांचे सहकार्य पोलिसांना मिळावे यासाठी मदत करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सणासुदीची चाहूल लागल्याने सोने महागले, 70 हजारच्या जवळ पोहोचली किंमत, जाणून घ्या 22-24 कॅरेटचा दर

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed