Shivsena UBT | शिवसेनेत पुण्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद; लोकांची पहिली पसंती उद्धव ठाकरेच

Sanjay Raut-Uddhav Thackeray

पुणे : Shivsena UBT | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज (दि.३) पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे मेळावा पार पडला. यावेळी बोलताना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) विरोधकांवर निशाणा साधला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेत आहे.

दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्याचे काम शिवसेनेने खूप केले मात्र आता शिवसैनिकांनी स्वतःसाठी लढण्याची वेळ आली आहे. आपण महाविकास आघाडी बरोबर असलो तरी राज्यातील लोकांची पहिली पसंती ही उद्धव ठाकरे असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत म्हणाले, ” एक तर तू राहशील किंवा मी राहील हा सांगणारा माझा नेता आहे. लोकसभेत आपण जिंकलो असलो तरी शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. आपण गाफील राहिलो, अन्यथा मोदी गेल्यात जमा होते.

एका अहवालानुसार देशातल्या एकूण ५३८ लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. हा विजय चोरलेला आहे. अन्यथा भाजपचा पराभव निश्चित होता. अशा प्रकारचे उद्योग हे विधानसभेत मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. जिथे आहात तिथे शेवटपर्यंत लढा, तिकीट कोणालाही मिळू द्या. उद्धवजी (Uddhav Thackeray) देतील तो उमेदवार समजून कामाला लागा.

पक्षात मरण आले तरी चालेल पण, शरण जाणार नाही हा मंत्र जपा, आपल्या मनातील जळमटे दूर करा. बाळासाहेबांचे ऋण आपल्याला फेडायचे असून गद्दार मेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याशी लढाई नसून आपली सत्तेवर येण्याची लढाई आहे. २८८ पैकी १६० उमेदवार निवडून येतील एवढी आता शिवसेनेची ताकद आहे. पण, आपण शब्दाला जगणारी माणसं आहोत. त्यामुळे आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा”, असा सल्ला त्यांनी शिवसैनिकांना दिला.

ते पुढे म्हणाले, “भाजपला मते चोरून मिळालेल्या अधिकच्या ३०-३५ जागांमध्ये शिवसेनेच्या ४ जागा आहेत. एक तर तू राहशील किंवा मी राहील ही आपली निवडणुका जिंकण्याची टॅगलाईन असेल. तू जाशील आणि मीच राहील हे लक्षात ठेऊन काम करा.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात तर औरंगजेब गुजरातेत जन्माला आला होता.
भाजपचे विचार हे औरंगजेबाचे असून मोदींना औरंगजेबाप्रमाणे अनेक छंद आहेत.
शिवसेना गिळण्याचे काम करू नका ते पचणार नाही. भाजपला यावेळी हिंदूंनी मतदान केले नाही.
पण, शिवसेनेला हिंदूसह सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केले. तुमच्यासोबत शिवसेना होती म्हणून तुम्हाला हिंदूची मते मिळाली.

३७० हटविण्याला ५ वर्षे होत आहेत. मात्र, काश्मीरमधील हिंदूसाठी भाजपने पाच वर्षात काय केले? गायीचे मांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून २ हजार कोटीचा निधी घेतला. केदारनाथच्या मंदिरातील ५०० किलो सोने कोणी चोरले? अयोध्येत प्रभू राम गळक्या छपराखाली कोणी बसविला? हा प्रश्न हिंदू म्हणून भाजपाला विचारण्याची गरज आहे “, अशी टीकाही राऊत यांनी केली.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी, कोथरूड या जागांवर दावा सांगितला. महाविकास आघाडीतील प्रेमापोटी या जागा सोडू नयेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सणासुदीची चाहूल लागल्याने सोने महागले, 70 हजारच्या जवळ पोहोचली किंमत, जाणून घ्या 22-24 कॅरेटचा दर

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?

Pune Court Crime News | शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्यध्यापकाला 2 वर्षे कारावासाची शिक्षा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन

Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

Devendra Fadnavis | ‘दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात ?’ फडणवीस म्हणाले – ‘राजकारण हा अनिश्चिततेचा निश्चित खेळ त्यामुळे…”

You may have missed