Ajit Pawar NCP | राष्ट्रवादीच्या आमदाराची राजकारणातून निवृत्ती जाहीर; अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर दबावतंत्र? राजकीय वारसदारही केला जाहीर
माजलगाव: Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सूरु झालेली आहे. अनेकजण अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) जाण्यास इच्छुक आहेत. आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आलेली आहे. (Ajit Pawar NCP)
अशातच माजलगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार (Maharashtra Assembly Election 2024) नसल्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करीत गावागावात सभा घेत असतानाच सोळंकी यांनी ही घोषणा केलेली आहे. यावेळी सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली.
सोळंकी यांनी आपली राजकीय निवृत्ती घोषित करतानाच आपला वारासदारही जाहीर केला आहे. पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक जयसिंह लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश सोळंके यांचे कनिष्ठ बंधू धैर्यशील सोळंके यांचा जयसिंह हा मुलगा आहे. धारूर पंचायत समितीचे उप सभापती, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. आता अजित पवार याला मान्यता देतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०१९ ला चौथ्यांदा निवडून आल्याने आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतू त्यांना ना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले ना शिंदे सरकारमध्ये. मंत्रिपद न दिल्याने नाराजीतून ठाकरे सरकारमध्ये ते आमदार पदाचा राजीनामा देणार होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा शब्द अजित पवार आणि जयंत पाटलांनी दिला होता.
तसेच एक वर्षानंतर प्रदेशाध्यक्ष पदही दिले जाणार होते. परंतू, मंत्रिपदाने,
कार्याध्यक्षपदाने आणि प्रदेशाध्यक्ष पदाने त्यांना हुलकावणी दिली. आता सोळंके यांनी निवृत्ती जाहीर करून राष्ट्रवादीवर दबावतंत्र तर वापरले नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?