Sunny Vinayak Nimhan | पाऊस असूनही नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद – केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे : Sunny Vinayak Nimhan | “शहरामध्ये मुसळधार पाऊस असूनही शिबारास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. मागील २० ते २५ दिवसात समाजातील शेवटच्या माणसापर्यंत ही योजना पोहचवणे, त्यांना या शिबीराची माहिती देणे, जवळपास ६० हजार घरामध्ये ही मंडळी पोहचली. नागरिकांच्या आजारांची माहिती घेऊन त्या आजारावरती महा-आरोग्य शिबीरामध्ये (Maha Health Camp) काय काय उपचार करता येतील याचे मार्गदर्शन केले. पुणे शहरात सनी निम्हण यांनी चांगल्या प्रकारे शिबीर आयोजित केले.
समाजातील शेवटच्या माणसाच्या आरोग्याच्या सुरक्षेचा आपण विचार करतो, त्यावेळी सगळी माणसं एकत्र येतात. राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी खूप चांगले काम केले. आज त्यांच्या जयंतीला हजारो नागरिकांना उपचार मिळतात, ही खरी त्यांना आदरांजली आहे. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांची तपासणी होते, उपचार केले जात आहेत. त्यांना मार्गदर्शन केले जाते. लोकसहभाग आणि राज्यशासन यांच्या माध्यमातून शिबीरांचे आयोजन केले जाते. शिबीराचे नियोजन चांगल्या पध्दतीने केले, मागील वर्षी केलेल्या शिबीराचा हजारो रूग्णांना प्रत्यक्ष लाभ झाला, मागील वर्षीच्या शिबीर आयोजनाचा अनुभव सनीच्या पाठीशी होता, त्यामुळे आज कितीही पाऊस झाला तरी देखील नियोजनात कुठे गडबड झाली नाही, नागरिकांचा सहभाग , प्रतिसाद कुठेही कमी झालेला दिसत नाही. महा-आरोग्य शिबीरात हमखास उपचार मिळतात हे माहित असल्याने पाऊस असूनही नागरिकांचा प्रचंड सहभाग दिसून आला. हेच चांगल्या आयोजनाचं यश आहे, म्हणून सर्व निम्हण कुटुंबीयांचे व कार्यकत्यांचे अभिनंदन केले पाहिजे. (Murlidhar Mohol)
पवार कुटूंबीय सुसंस्कृत निम्हण कुटूंबीयांच्या कायम खंबीरपणे मागे – खासदार सुप्रिया सुळे
“निम्हण कुटुंबातील लेक, सून ही सनीची ताकद आहेत. सनी भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या आई , पत्नी, बहिण कर्तुत्ववान आहेत. निम्हण कुटुंब आणि आमचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. मैत्री कशी असावी? याचे उदाहरण म्हणजे तुमच्या आणि आमच्या वडिलांची मैत्री होती. समाजाशी आपलं काहीतरी देणं आहे. याची जाणीव ठेवून निम्हण कुटूंबीय काम करत आहेत. ऐवढा पाऊस असून देखील या ठिकाणी डॅाक्टर, नर्स, उपस्थित आहेत. आमच्या सर्वांच्या आयुष्यातील चांगले बदल हे डॅाक्टरांमुळे होतात. (Supriya Sule)
आपण म्हातारे झाल्यावर आपल्याला चांगले डॅाक्टर मिळतील की नाही? याची काळजी वाटते. कारण शिक्षणात विस्कळीतपणा आाला आहे. शिक्षणात मुलांची चुक नाही, त्यात धोरणात्मक चूक आहे. आमदार झालात तर आम्हाला मनापासून आनंदच होईल. कोणत्याही पक्षातून आमदार झाले तरी काही हरकत नाही. चांगले लोक निवडून आल्यावर एखांद्या राज्याचा आणि देशाचा पुढचा जो विकास होतो तो त्यांच्यामुळे होतो. राजकारण होत राहील, निवडणूक होईल परंतु जो समाजिक वारसा निम्हण कुटुंबीय चालवत आहेत त्याचे कौतुक आहे.
आबांचा सामाजिक वारसा माझा वसा म्हणून पुढे घेऊन जात आहे- आयोजक सनी निम्हण
रूग्णांसाठी दि २२ जुलै ते २ आॅगस्ट २०२४ पर्यंत रूग्ण पुर्व तपासणी अभियान राबविले, त्यामध्ये पुणे ६९७५६ रुग्णांची प्रत्यक्ष पुर्व तपासणी करण्यात आली. द्वितीय रूग्ण तपासणी अभियानात अवश्यक रूग्णांची रक्त ,लघवी, ईसीजी, एक्स -रे, सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी इत्यादी प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या होत्या. तिसऱ्या टप्यात, आजच्या शिबीरामध्ये आलेल्या रूग्णांची डॅाक्टरांकडून तपासणी पूर्ण होऊन डॅाक्टरांनी सांगितलेल्या शस्रक्रिया इतर गोष्टी पुढील महिनाभरात मोफत केल्या जाणार आहेत. जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम हा आबांचा सामाजिक वारसा माझा वसा म्हणून पुढे घेऊन जात आहे. समाजाला देणं लागतो ही त्यांची शिकवण आहे.त्यानिमित्त हे आरोग्य शिबीर आयोजित करत आहे. त्यामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्र शासन, निमसरकारी अधिकारी , प्रशासकीय आधिकारी, रूग्णालय, डॅाक्टर, पुणे महापालिका व सर्व माझे सहकारी व निम्हण कुटुंबीयांचे मी मनापासून आभार मानतो. यावेळी राष्ट्रवादी कॅाग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक निलेश निकम, उद्य महाले, पृथ्वीराज सुतार,बाळासाहेब बोडके, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबीराची वैशिष्टे
सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांचेकरीता मोफत नास्ता व भोजनाची व्यवस्था आयोजक सोमेश्वर फॉऊंडेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचेकडुन करण्यात आली होती. या महा-आरोग्य शिबीरात एकुण ६८२४८ रुग्णांनी लाभ घेतला.
मा. कार्यसम्राट आमदार विनायकजी निम्हण महा-आरोग्य शिबीरात खालील प्रमाणे रुग्णांची तपासणी करण्यात आली.
आयुष विभाग – 3560
दिव्यांग रुग्ण साहित्य व कृत्रीम अवयव नोंदणी – ७००
सामान्य औषध -6533
हृदयविकार-१५००
श्वसन विकार – 6205
वृद्धत्व – ६०२०
त्वचाविकार – ६००८
मनोविकार – ३५१
अनुवंशीकविकार – २००
मेंदुविकार – १२५१
कान नाक घासणे –
नेत्रचिकीत्सा विभाग- १००२१
सामान्य शस्त्रक्रिया- 6006
लठ्ठठपणा – ३५०
प्लास्टिक सर्जरी – ७५०
मुत्रविकार – ११००
कर्करोग- ५५०
अस्थिव्यंगोपचार – १००९
फिजीओथेरपी – ७५२
बालविकार – २०२२
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र – २१५०
दंतचिकीत्सा – ३००५
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?