Madha Assembly Constituency | ‘माढ्या’वरून मविआत राजकारण तापलं; शरद पवार गटाच्या जागेवर काँग्रेसचा दावा
माढा: Madha Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मतदारसंघात गावोगावी जाऊन इच्छुक उमेदवार भेटीगाठी-मेळावे घेत असल्याचे चित्र आहे. मात्र महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून वाद उद्भवू शकतात अशीही परिस्थिती आहे. असाच एक वादंग माढा मतदासंघातून पुढे येतोय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माजी आमदार धनाजी साठे (Dhanaji Sathe) यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आहे. मीनल साठे या सध्या माढा नगरपंचायत नगराध्यक्षा आहेत. त्यांना माढा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माढा मतदारसंघातून जनसंवाद यात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मविआ चा धर्म पाळत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. महाविकास आघाडीकडून माढा विधानसभा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) यांच्यात वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कालच (दि.४) अजित पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjitsingh Shinde ) यांनी मोदीबाग (Modibaug Pune) याठिकाणी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्याचे पाहायला मिळाले.
माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार गटाकडून धनराज शिंदे, संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे हे इच्छुक आहेत. तसेच अभिजित पाटील यांच्यासह मिनल साठे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. मात्र, अशातच आता बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?