Daund Pune Crime News | दौंड हादरलं! सोडचिट्टीस नकार, पत्नीच्या भावाला कोयत्याने वार करत संपवलं; आईचा आक्रोश हृदय हेलवणारा
यवत: Daund Pune Crime News | पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला सोडचिट्टीसाठी नकार दिला तसेच तिच्या भावाचा खून केल्याची घटना दौंड तालुक्यातील खामगाव (Khamgaon Daund) परिसरात शनिवारी (दि.३) घडली. सुरज राहूल भुजबळ (वय.२३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमित जयवंत बहिरट (वय.२४) आणि समीर जयवंत बहिरट (वय.२२) या दोघा सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईचा आक्रोश हृदय हेलवणारा होता. (Murder Case)
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज यांची बहिण संजना हिचा प्रेम विवाह अमित बहिरट याच्याशी दिड वर्षापुर्वी झाला होता. ते दोघे मुंबई येथे रहात होते. दारु व्यसनातुन संजनाचा अमित हा छळ करत होता. त्याच्या त्रासाला वैतागून संजना माहेरी आली होती. तरीदेखील त्याठिकाणी येऊन अमित बहिरट हा पत्नी संजना हिचा छळ करत होता. ( Daund Pune Crime News)
त्यामुळे संजनाच्या फिर्यादीनुसार अमित बहिरट याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी नातेवाईकांनी घेतलेल्या समझोता बैठकीतच अमितने संजनास सोडचिठ्ठी देण्यासाठी ५ लाख रुपये मागणी केली. त्यावेळी अमित याने सोडचिट्टी तर देणार नाही, तसेच तुझ्या मुलाचे तुकडे करीन, अशी धमकी मयत सुरज भुजबळच्या आईला दिली होती.
शनिवारी (दि.३) सुरज हा त्यांच्या कापड दुकानात बसला असता अमित जयवंत बहिरट
आणि समीर जयवंत बहिरट या दोघा भावांनी सुरज राहुल भुजबळ याचा खून केला. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईने फोडलेला हंबर्डा हृदय हेलावणारा होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सांगे यांनी भेट दिली. याप्रकरणी अमित बहिरट व समीर बहिरट या दोघांनाही अटक करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?