Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Ajit Pawar

बारामती : Ajit Pawar NCP Baramati | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी बारामतीच्या राजकारणात बारकाईने लक्ष देत आहेत. या पार्श्वभूमीवर महत्वाच्या विकासकामांवर लक्ष घालत कार्यकर्ते यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.

दरम्यान बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी आक्रमक होत पदाधिकाऱ्यांना पुढील आठ दिवसात राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शहर, तालुक्यात खांदेपालट होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार बारामतीत पक्ष पातळीवर पक्षनिष्ठ आणि नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.५) बारामतीत आयोजित मेळाव्यात अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितले. (NCP Baramati Melava)

पवार हे रविवारपासून बारामती दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांचा बोरकरवाडी येथे जाहीर कार्यक्रम झाला. त्यानंतर ते बाबुर्डी येथे गेले. जिरायती दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांच्य कार्यपध्दतीबाबत अनेकांनी पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी सोमवारी तात्काळ निर्णय घेतला.

पवार म्हणाले, आपल्याच स्टेजवर बसायचे आणि आपला कार्यक्रम करायचा असे चालले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, दादा तुमचा म्हणवला जाणारा कार्यकर्ता प्रत्यक्षात तुमचा नाही. एवढे दिले आणि काम मात्र चुकीचे करायचे. हे चालणार नाही. अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, पाहायला मिळाल्या आहेत.

इथे बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मपरिक्षण करावे, आपण प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या बुथवर जिथे मतदारयादीत नाव आहे,
तेथे तरी घड्याळाला मताधिक्य मिळाले का असा सवाल त्यांनी केला.
तसेच १५ ऑगस्टपूर्वी नवीन निवडी केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’

Gold-Silver Rate Today | सणासुदीची चाहूल लागल्याने सोने महागले, 70 हजारच्या जवळ पोहोचली किंमत, जाणून घ्या 22-24 कॅरेटचा दर

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

You may have missed