Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | मित्राला सोडायला गेला असताना इतरांनी आग्रह करुन गटारीला जेवायला घातले. त्यानंतर तरुणावर अचानक कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी (Attack On Youth) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सोहेल इसाक शेख (वय २०, रा. आलिफनगर, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक जाधव, सनी जाधव, विजय जाधव (सर्व रा. थेऊर, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार थेऊर नायगाव रोडवरील (Theur To Naigaon Road) दिल्लीवाला गोठा येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे थेऊर बसस्टॉपवर केस कापण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा मित्र विनायक गावडे याने मला दिल्लीवाला गोठा येथे सोड, असे सांगितले. त्यानुसार ते मोटारसायकलवरुन दिल्लीवाला गोठा येथे गेले. त्यावेळी तेथे त्यांच्या परिसरातील ओळखीचे सुरज शेख, प्रविण चेपटे, विजय जाधव, सनी पवार, दीपक जाधव हे गटारी अमावस्याच्या निमित्ताने जेवण करुन बसले होते. आजू बाजुला जेवणाचे साहित्य, दारुच्या मोकळ्या बाटल्या पडलेल्या होत्या.
प्रविण चेपटे याने फिर्यादी यांना तू देखील जेवण कर, असे म्हणाला. म्हणून फिर्यादी व विनायक गावडे या दोघांनी जेवण एकत्र केले. जेवण झाल्यानंतर सर्व जण काही वेळ बसले होते. त्यावेळी दीपक जाधव, सनी पवार, विजय जाधव यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
इतर जण भांडणे सोडवू लागले. त्यावेळी सनी पवार याने धारदार हत्याराने डोक्यात मारले.
फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने ते तेथून धावतच घरी आले.
त्यानंतर त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
आपातकालीन विभागामध्ये उपचार घेत असलेल्या फिर्यादीची हॉस्पिटलमध्येच फिर्याद घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’