Shirur Pune Accident News | शिरूरमध्ये कंटनेर स्विफ्टचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
शिरूर : Shirur Pune Accident News | नागरगाव फाटा येथे कार व कंटेनरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार (दि.५) शिरूर-सातारा महामार्गावर (Shirur Satara Road) नागरगाव फाटा येथील हॉटेल अन्नपूर्णा समोर घडली.
मनोजकुमार सोन्याबापू औटी (वय-३२, रा- राळेगणसिद्धी, ता-पारनेर ,जि -अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सागर रावसाहेब भुजबळ (रा-भुजबळवस्ती पोहेगाव, ता- कोपरगाव, जि – अहमदनगर) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत लाभेश गणपतराव औटी (वय-३९, व्यवसाय- शेती, राळेगणसिद्धी, ता-पारनेर, जि-अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून कंटेनर चालक दत्ता चांगदेव सोनवणे (रा.किनगाव, ता-अहमदपुर, जि-लातुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील नागरगाव फाटा येथील हॉटेल अन्नपुर्णा समोर हा अपघात झाला आहे.
कंटेनर चालक दत्ता सोनवणे हा कंटेनर (एन. एल. ०१ ए-ई ८२५२) भरधाव वेगात चालवत पुढे जात असताना स्विप्ट कार (एम. एच. १२ एच.झेड ७५७७) यामधुन जात असलेल्या मनोजकुमार औटी यांना जोरदार धडक दिली.या अपघातामध्ये औटी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला,
तर सागर भूजबळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात लाभेश औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सोनवणे
याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे
यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर