Puja Khedkar | पूजा खेडकर विरोधात पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल; पूजा खेडकरवर अब्रू नुकसानीचा दावा
पुणे : Puja Khedkar | पूजा खेडकरनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार पुजा खेडकरने पोलिसांना दिली आहे आणि यूपीएससीकडे देखील तशी तक्रार केली होती. दरम्यान त्याबाबत आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) पुजा खेडकरवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसेंनी छळ केल्याचा पुजा खेडकरचा आरोप आहे. दरम्यान या आरोपांबाबत चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स बजवून देखील पूजा खेडकर हजर झालेली नाही. आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची बदली वाशिमला झाल्यावर तिने तिथे जिल्ह्याधिकारी दिवसे यांच्याविरोधात छळ केल्याची तक्रार दिली होती.
वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा खेडकरची तक्रार नोंदवून घेतली. मात्र दिवसे यांच्या विरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला या तक्रारी संदर्भात काही चौकशीसाठी तब्बल तीन वेळा समन्स पाठवून देखील ती गैरहजर राहिली होती.
पूजा खेडकरचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर युपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजाने मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नव्हते.
तसेच पुणे पोलिसांनी देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
पण याची देखील तिने दखल घेतली नव्हती. दरम्यान, पूजाने दिल्लीच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
त्यामुळे आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला शोधून अटकेची कारवाई करावी लागणार आहे. (Puja Khedkar)
वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
त्याशिवाय, बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप पूजा खेडकरवर ठेवण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर