Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
खडकवासला: Crocodile In Varasgaon Dam | वरसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मगर आढळली आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास धरणावरील सुरक्षा मंडळाचे कर्मचारी राहुल जाधव, कुणाल बोराडे पाण्याची पातळी पाहण्यासाठी भिंतीवरून जात होते. त्यावेळी त्यांना अंधारात समोर हालचाल दिसली.
त्यांनी विजेरीच्या उजेडात पाहिले असता त्यांना ती मगर असल्याचे दिसून आले. ती मगर धरणाच्या भिंती लगत असलेल्या सुरक्षा चौकीच्या दिशेने येत होती. त्यांनी मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात तिला पाहिले त्यानंतर तिने दिशा बदलली आणि ती पुढे धरणाच्या भिंतीवरून जाऊ लागली.
तातडीने ही घटना शाखा अभियंता वीरेश राऊत यांना फोनवरून कळवली. तेही मुक्कामी असल्याने ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ही घटना वेल्हे वनविभागाला कळवली. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीम रात्री अकरा वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याची पातळी पाहण्यासाठी धरणाच्या भिंतीवर जावे लागते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (Crocodile In Varasgaon Dam)
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सातत्याने पाण्याची पातळी कमी-जास्त होते हे पाहण्यासाठी येथे जावे लागते.
त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी वीरेश राऊत यांनी मगरीला पकडून पाण्यात टाकण्यास सांगितले.
परिसरातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून