Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधातून महिलेने साथीदाराच्या मदतीने प्रियकराला संपवले

Murder Due To Immoral Relationship (1)

लोणार : Murder Due To Immoral Relationship | यज्ञेश्वर मंदिराजवळील दर्गा रोड बाजूच्या घनदाट जंगलात एका २८ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आला. तसेच मृतदेह जंगलात फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव अर्जुन दिलीप रोडगे (वय-२८) असून तो परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील रवळगाव येथील रहिवासी आहे.

ही घटना काल सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे लोणार शहरात एकच खळबळ उडाली होती. अनैतिक संबंधातून महिलेने साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रोडगे हा (दि.२) पासून घरून निघून गेल्याची तक्रार त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यांनी शेलू पोलिस स्टेशनला केली होती. पोलिस तपासात मृतक अर्जुनचे गावातीलच एका २९ वर्षीय विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शेलू पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच ती बोलू लागली.

तिने साथीदाराच्या मदतीने अर्जुनचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. सदर खून लोणार सरोवर परिसरात करून मृतदेह घनदाट जंगलातील जाळीत फेकून दिल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे शेलू पोलिसांचे पथक (दि.५) रोजी रात्री १० वाजता आरोपी महिलेला घेऊन लोणार नजीकच्या जंगलात दाखल झाले.

तिने मृतक अर्जुनचा खून कुठे केला व त्याचा मृतदेह कुठे फेकला, हे स्थळ पोलिसांना दाखविले.
अर्जुनचा खून करण्यासाठी तिला मदत करणारा तिचा साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आहेलाजी डुकरे (वय-२४, रा. खडुळा, ता.पाथरी परभणी) यालाही पोलिसांनी अटक केली.
मृत अर्जुन व महिला आरोपी यांनी लोणार सरोवर फिरायला जाण्याचा बेत आखला.

(दि.२) ते स्कुटीने लोणार सरोवर परिसरात आले.
सरोवरच्या गेटवर त्यांनी रीतसर नोंदणी केली.
त्यानंतर आतमध्ये दर्गा रोडने जाणाऱ्या पाऊलवाटेने जाऊन एका झाडाखाली बसले.
तेथेच लपून असलेल्या आरोपीच्या मित्राने अर्जुनवर हल्ला केला व गळा दाबून त्याचा खून केला.
यानंतर मृतदेह ओढत नेऊन जंगलातील झाडीत फेकून दिला.
तेथून आरोपी महिला स्कुटीने परत निघाली व स्कुटी ढोकसळ गावाच्या समोर सोडून तेथून गावी परतली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

You may have missed