Murlidhar Mohol | पुण्यातले खड्डे बुजवण्यासाठी रामबाण ठरला ‘मोहोळ पॅटर्न’ ! अवघ्या 72 तासांत बुजविले गेले 1 हजार 518 खड्डे

Murlidhar Mohol

केंद्रीय ⁠राज्यमंत्री मोहोळांच्या निर्देशानुसार काम युद्धपातळीवर सुरु

पुणे : Murlidhar Mohol | गेल्या काही दिवसांत पुणे शहरात मुसळधार पावसाने (Pune Rains) मोठ्या प्रमाणात झालेल्या खड्ड्यांमुळे पुणेकर अक्षरशः बेजार झाले होते. रस्त्यांवर खड्डे (Pothole On Pune Road) आणि खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे पुणेकर वाहनचालकांना जीव मेटाकुटीला आला होता. ही बाब दिल्लीत अधिवेशनात असणारे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पुण्यात येत महापालिका अधिकारी (PMC Officers) आणि पुणे पोलिसांची (Pune Police) एकत्रित बैठक घेत अल्टिमेट दिला आणि लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले. त्यावर अवघ्या ७२ तासांत पुणे शहरातील तब्बल १ हजार ५१८ खड्डे बुजवण्यात आले आहेत. प्रशासकीय पकड मिळवत खड्डे बुजविण्यासाठी रामबाण ठरलेल्या या ‘मोहोळ पॅटर्न’ची (Mohol Pattern) पुण्यात जोरदार चर्चा आहे.

जुन आणि जुलै महिन्यात पुण्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात ज्या-ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली. पाऊस सलग असल्याने खड्ड्यांची संख्या वाढतच होती. एकीकडे डोक्यावर पाऊस, रस्त्यात खड्डे आणि वाहतूक कोंडी अशा तिहेरी संकटात पुणेकर सापडले होते. मोहोळ यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी अधिवेशनावरुन पुण्यात येत थेट महापालिकेत बैठक घेतली आणि खड्ड्यांबाबत प्रशासनाला खडेबोल सुनावले. शिवाय लवकरात लवकर खड्डे बुजविण्यासंदर्भात निर्देशही दिले.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीनंतर लगेचच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शिवाय केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सूचित केल्याप्रमाणे १५ वॉर्डांसाठी ३० टीम तयार करण्यात आल्या. अवघ्या ७२ तासांत पुणे शहरातील तब्बल १ हजार ५१८ खड्डे बुजविण्यात आले, तर ३१२ पॅच वर्कची कामे करण्यात आली. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, शिवाय वाहतुकीला गती येण्यास मदत झाली आहे.

या संदर्भात केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘मोठ्या प्रमाणात झालेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागला, अडचणींना सामोरे जावे लागले. म्हणूनच पुणेकरांना खड्ड्यांपासून दिलासा देण्यासाठी महापालिकेत महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेतली आणि त्यानंतरच शहरात खड्डे बुजवण्याच्या, पॅच वर्कच्या कामाला वेग आलेला असून काम युद्धपातळीवर सुरु आहे. (Murlidhar Mohol)

‘आता पावसानेही उघडीप घेतली असल्याने या कामाला आणखी वेग देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल.
महापालिकेच्या संबंधित विभागांनी पुढील काळातही सतर्क राहून पुणेकरांना दिलासा द्यावा, ही अपेक्षा आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

You may have missed