Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे; पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल

Reverse Thrill Pickup Vehicle

पुणे : Hadapsar Pune Crime News | हडपसर अत्यंत भयानक जिवघेणा रिव्हर्स थरार हा धडकी भरविणार्‍या व्हिडिओमागील कारण समोर आले आहे. या पिकअप वाहन चालकावर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/C-UiJtHJRpl

श्रावण वाघमारे असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. हा प्रकार रामटेकडी उड्डाणपुलावर ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी घडला होता. (Hadapsar Pune Crime News)

याबाबत पोलीस शिपाई उमेश मच्छिंद्र शेलार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या अंतर्गत रामटेकडी उड्डाणपुलावर डिव्हायरचे काम चालू होते. या कामाच्या ठिकाणी वापरात येणारा पिकअपचा चालक श्रावण वाघमारे याने रामटेकडी उड्डाणपुलावर वाहन पार्क करताना हॅन्डब्रेक न लावता उतारावर तसाच उभा केला व तो पिकअपमधून उतरला.

त्यामुळे पिकअप व्हॅन उतारावर वेगाने रिव्हर्स जाऊ लागली.
सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पुलावर वाहतूक नसल्याने रोडवर वाहनांची गर्दी नव्हती.
पिकअप तब्बल ५०० मीटर उलट्या दिशेने गेल्यानंतर डिव्हायडरला धडकून थांबला. त्यामुळे मोठी हानी टळली़.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘मुख्यमंत्री करतो असं सांगितलं असतं तर शिंदेंआधी मीच पूर्ण पक्ष घेऊन आलो असतो’ – अजित पवार

Maharashtra Assembly Election 2024 | मविआकडून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? दिल्लीतील गाठीभेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

You may have missed