Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता, इंजिनिअरसह तिघांना अटक
पुणे : Pune ACB Trap Case | पंतप्रधान आवास योजने (PM Awas Yojana) अंतर्गत घरकुलासाठी मंजूर झालेल्या दीड लाख रुपयांचा हप्ता देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Pune Bribe Case). लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पीएमआरडीचे कनिष्ठ अभियंता, इंजिनिअर यांच्यासह खासगी व्यक्तीला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पीएमआरडीने घरकुल योजनेची कामे करुन देण्यासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचारी नेमले असून त्यांनी सध्या धुमाकुळ माजविला आहे. त्यामुळे शासकीय योजनेची मदत त्यांच्यापर्यंत न पोहचता गरीब लोक नागावले जात आहे. (Pune ACB Trap Case)
तेजस संपत तावरे Tejas Sampat Taware ( वय ३२, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी), हेमंत लालासो वांढेकर Hemant Lalaso Wandhekar (वय २९, इंजिनिअर कंत्राटी दोघेही नेमणूक, पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी, पिंपरी चिंचवड) आणि रामदास ऊर्फ बाबू मारुती कटके Ramdas alias Babu Maruti Katke (वय ४८, रा. भिवरी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता. या योजनेतून तक्रारदार यांना घरकुलाचे अडीच लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता एक लाख रुपये तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. उर्वरित दीड लाख रुपये जमा करण्याचे आमच्या हातात आहे. ती रक्कम तक्रारदार यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी हेमंत वांढेकर व रामदास कटके यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी करताना तेजस तावरे, हेमंत वांढेकर व रामदास कटके यांनी पीएमआरडी कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सासवड बसस्टँडसमोरील हॉटेल सिद्धेश्वर येथे बुधवारी सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून ५० हजार रुपये घेताना तिघांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा (Saswad Police Station) दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (PI Prasad Lonare) तपास करीत आहेत.
शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी एजंटने कोणतेही शासकीय काम करुन
देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तत्काह
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा,
असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांनी केले आहे़.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून