Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन
पुणे : Pune Crime Court News | तस्करी करुन पुण्यात गांजा विक्री (Ganja Selling) करण्यासाठी आलेल्या धुळ्यातील सिव्हिल इंजिनिअर तरुणाची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. (Pune Crime Court News)
करण युवराज बागुल Karan Yuvraj Bagul (वय २३, रा. पद्यावती कॉलनी, शिरपूर, धुळे) असे जामीन मिळालेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pune) कात्रज परिसरात (Katraj) कारवाई करुन गांजाची तस्करी उघडकीस आणली होती. हरीओम संजय सिंग Hariom Sanjay Singh (वय २१, रा. मोहाडी, धुळे), करण युवराज बागुल (वय २३, रा. पद्मावती कॉलनी, शिरपुर, धुळे), वसंत सुभाष क्षिरसागर Vasant Subhash Kshirsagar (रा. आंबेगाव बुद्रुक) या तिघांना अटक केली होती. हरीओम सिंग हा इलेक्ट्रीकची कामे करतो,
त्याच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात (Shirpur Police Station) आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे, तर करण बागुल हा सिव्हिल इंजिनिअर असून त्याच्यावरही शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्यांनी आंबेगाव बुद्रुक येथील वसंत क्षीरसागर यांना देण्यासाठी गांजा आणल्याची कबुली दिली होती. क्षीरसागर हा बीबीएचे शिक्षण घेत आहे. फेब्रुवारीमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
आरोपीच्या वतीने अॅड. श्रीनाथ राजू मते (Adv Shrinath Raju Mate),
अॅड. पवनराजे डोईफोडे (Adv. Pawanraje Doifode), अॅड. विजय पवार (Adv Vijay Pawar) व अॅड. देवांशी बुरांडे (Adv. Devanshi Burande) यांनी करण बागुल याचा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. विशेष सत्र न्यायाधीश डोरले यांच्या समोर याची सुनावणी झाली. वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीचा जामीन मंजूर केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी