Lonikand Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार ! जातीवरुन नकार देणार्‍या तरुणावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

Molestation

पुणे : Lonikand Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) त्याने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर घरचे खालच्या जातीची मुलगी सून नको असे म्हणत असल्याचे सांगून लग्नाला नकार देणार्‍या तरुणावर लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) अ‍ॅट्रोसिटीचा (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वाघोलीतील (Wagholi) एका २३ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक संजय मगर Abhishek Sanjay Magar (वय २३, रा. पातरवाला बुद्रुक, ता. अंबड जि. जालना)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते ७ एप्रिल २०२४ दरम्यान घडला. (Rape Case Pune)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मागासवर्गीस असल्याचे माहिती असूनही अभिषेक मगर याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर तो दर दोन तीन महिन्यांची फिर्यादीला पैसे मागू लागला. पैसे कमी दिल्यास किंवा पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ व हाताने मारहाण करीत होता. तो फिर्यादी यांना आपल्या मुळ गावी घेऊन जात होता. गाडी रस्त्यात थांबवून तो फिर्यादीला म्हणाला की, आपल्या घरात खालच्या जातीची मुलगी सून नको, असे माझ्या घरच्यांनी सांगितले आहे. तरी ते तुला घरात घेणार नाही, तू इथुन निघून जा, असे म्हणत तिला गाडीतून ढकलून दिले. त्यानंतर फिर्यादी या पुण्यात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे (ACP Pranjali Sonawane) तपास करीत आहेत. (Lonikand Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed