Bibvewadi Pune Crime News | दहशत माजविणारा तडीपार गुंड निलेश कुडलेवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल

Bibvewadi-Police-Station

पुणे : Bibvewadi Pune Crime News | तडीपार असताना (Tadipar Criminal) पुण्यात येऊन दहशत माजवून तरुणाला लुटणार्‍या तडीपार गुंड निलेश कुडले (Nilesh Kudle) याच्यावर बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरीचा (Robbery Case) गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथील पापळ वस्तीमध्ये (Papal Vasti Bibvewadi) ३ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता ही घटना घडली होती. निलेश कुडले हा बेकायदेशीरपणे पुण्यात आला असताना धनकवडीमध्ये त्याचा तरुणांशी वाद झाला होता. त्यावेळी तरुणांनी केलेल्या मारहाणीत निलेश कुडले हा जखमी झाला होता.

निलेश कुडले याच्यावर खूनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी यासह चार गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ असे असताना तो बेकायदेशीरपणे पुण्यात आला होता. (Bibvewadi Police Station)

याप्रकरणी करण राजेंद्र खुडेकर (वय २४, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्याचा मित्र करण गायकवाड याला सोडून घरी जात असताना निलेश कुडले हा हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करत दहशत निर्माण करत होता. त्यामुळे लोक तेथून निघून गेले. निलेश कुडले हा फिर्यादीजवळ आला. त्यांना कोयता दाखवून जबरदस्तीने पँटच्या खिशात हात घातला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला विरोध केला. त्यावर निलेश याने थांब तुला खल्लास करतो, मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का असे म्हणून धमकी देऊन खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याच्या साथीदाराने फिर्यादीस हाताने मारहाण केली. तीन ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता घडलेल्या या घटनेचा गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yevale) तपास करीत आहेत.

या घटनेनंतर निलेश कुडले हा धनकवडी येथील अर्चना टेरेस सोसायटी येथे गेला.
तेथे त्याचा वाद झाल्याने शुभम धोत्रे, सम्यक कांबळे, धिरज कोरके यांनी निलेश कुडले
याच्यावर वार करुन जखमी केले तसेच त्याच्या साथीदारांना मारहाण केली होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed