Supreme Court On Hijab | मुंबईतील कॉलेजमधील हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; ‘कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून…’

Supreme Court On Hijab

मुंबई : Supreme Court On Hijab | मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, नकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर देखील मागितले आहे. मुंबईच्या एनजी आचार्य आणि डिके मराठे कॉलेजने हिजाब, नकाब,बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे.

याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा सवाल देखील महाविद्यालय प्रशासनाला विचारला आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांना हवे ते परिधान करण्याचा पर्याय असणे आवश्यक असल्याचेही म्हंटले आहे. दरम्यान १८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयात हिजाब आणि बुरखा घालून येण्यास संस्थेकडून बंदी घालण्यात आली होती. यासंबंधी परिपत्रकही काढण्यात आले होते. दरम्यान कॉलेज प्रशासनाच्या या निर्णयावर आक्षेप घेत काही विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे याचिका फेटाळली गेल्यानंतर नऊ विद्यार्थिनींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून हिजाब, नकाब, बुरखा, स्टोल
तसेच टोपी परिधान करुन येण्यास बंदी घातली होती.
महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय धर्माचे पालन करण्याचा मुलभूत अधिकार तसेच गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये हिजाब बंदी संबंधीत कर्नाटकातील एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.
त्यावेळी दोन न्यायमूर्तीनी वेगवेगळा निकाल दिला होता. हिजाब, नकाब, बुरखा परिधान करण्यास प्रतिबंध घालण्यात
आल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम १९ (१) चे तसेच कलम २५ चे उल्लंघन होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता.
दरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed