Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पोर्शे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; डॉ. तावरेची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेला परवानगी

Ajay Taware

पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्या (Blood Sample Tampering Case) प्रक्रियेत पोलिसांच्या तपासात मुख्य सूत्रधार म्हणून ससून रुग्णालयातील तत्कालीन न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) याची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

येरवडा कारागृहात जाऊन डॉ. तावरेची चौकशी करण्याची परवानगी गुन्हे शाखेला (Pune Crime Branch) मिळाली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले होते. अल्पवयीन मुलाने अपघात केल्यापासून त्याला वाचवण्यासाठी कुटुंबातून तसेच ससून रुग्णालयाच्या पातळीवर अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाचेच रक्त बदलण्यात आले.

यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Builder Vishal Agarwal) याच्या सांगण्यावरून त्याचा बांधकाम व्यावसायिक मित्र याने निवृत्त सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याच्या मदतीने डॉ. तावरेची ओळख काढली होती. त्यानंतरच आर्थिक लाभापोटी डॉ. तावरे याच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) याने अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचेही रक्त बदलले होते.

तर डॉ. हळनोर याला २ लाख ५० हजार तर घटकांबळे याला ५० हजार रूपये मिळाले होते. यात अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची होती. तर विशाल अगरवालची पत्नी शिवानी हिचे रक्त अल्पवयीन मुलाचे रक्त म्हणून तपासणीसाठी देण्यात आले होते. हे तपासात निष्पन्न झाले आहे.

महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुरव्यांशी छेडछाड करणे, न्यायिक प्रक्रियेतून बेकायदेशीररीत्या सोडवणे, न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी तपास यंत्रणांची दिशाभूल केली. त्यासाठी बनावटीकरण केले. डॉ. हळनोर रक्त नमुने बदलण्यासाठी जेवढा जबाबदार आहे, तेवढाच रक्त बदलण्यास सांगणारा डॉ. तावरेही जबाबदार असल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे.

तर अग्रवाल कुटुंबियांकडून चार लाख रूपये देण्यात आले होते. घटकांबळे याला त्यातील तीन लाख देण्यात आले.
त्यातील एक लाखाचा हिशोब पोलिसांना लागत नसल्याने त्याचा तपास डॉ. तावरेकडे करायचा आहे.
पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या ठपक्यामध्ये त्यांनी डॉ. तावरेचा गुन्ह्यात प्रत्यक्ष व सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे.
त्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला असून इतर स्वरूपाचा मोठा लाभ संबंधिताकडून देण्याची हमी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने व
डॉ. तावरे याच्यासह अन्य आरोपींकडून मिळालेली माहिती याचे धागेदोरे जुळवण्यासाठी गुन्हे शाखेकडून
तावरेची कारागृहात जाऊन चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.
गुन्हे शाखेला तपासासाठी परवानगी मिळाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed