Adv Avinash Salve Join Congress | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साळवे यांचे पक्षांतर!
पुणे :- Adv Avinash Salve Join Congress | शिवसेनेेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांनी आज मुंबई येथे कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. तब्बल चारवेळा नगरसेवक आणि एकवेळ महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भुषविलेल्या साळवे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार असतील अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात कॉंगे्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशअध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, नितीन राउत यांच्या उपस्थितीत साळवे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. साळवे हे २०१७ मध्ये येरवडा प्रभागातून शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. तत्पुर्वी ते तीनवेळा रिपाइं कडून महापालिकेवर विजयी झाले होते. तर एकदा त्यांनी कॉंग्रेसकडूनही निवडणूक लढविली होती. १९९२ पासून काही काळ वगळता सातत्याने महापालिकेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. ठाकरे गट हा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचाच घटक असल्याने साळवे यांचा कॉंग्रेस प्रवेश हा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच झाला असल्याची चर्चा आहे. विशेष असे की कॅन्टोंन्मेंट मतदार संघ राखीव असून महाविकास आघाडीमध्ये तो कॉंग्रेसकडे येण्याची चिन्हे आहेत. या मतदार संघातून साळवे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. (Adv Avinash Salve Join Congress)
यासंदर्भात साळवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापुर्वी देखिल मी कॉंग्रेसकडून महापालिका निवडणुक लढविली आहे. शिवसेनेने मला चांगली संधी दिली तसेच शिवसैनिकांनी माझ्यावर नेहमी विश्वास दाखविला. शिवसेनेबद्दल माझ्या मनात कायमच आदर राहील.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी
Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन