Eknath Shinde | मनसे-शिवसेना राड्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले – ‘ही तर अॅक्शनची रिअॅक्शन…’
मुंबई : Eknath Shinde | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बीड दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. राज ठाकरे सुपारी घेऊन बीडमध्ये आले असा आरोप करत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला. यानंतर त्याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेत माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने काल (दि.१०) ठाणे शहरातील गडकरी सभागृहात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांसह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि बांगड्या फेकल्या. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून ठाण्यातील राजकीय वातावरण रात्रभर तापलं होतं. (Eknath Shinde)
याबाबत पोलिसांनी मनसेच्या ४६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अजूनही मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” खरंतर या राड्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या दौऱ्यात झाली होती.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. त्याच अॅक्शनची ही रिअॅक्शन आज पाहायला मिळाली.
मी अशा घटनांचं समर्थन करत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी