Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | ‘भाजपामुक्त राम करून दाखवला’ उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – “जनता हिरवा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही”
मुंबई : Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा (Shivsena UBT) मेळावा ठाण्यात गडकरी रंगायतन येथे पार पडला. या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपाचे (BJP) बगलबच्चे आणि गद्दार मिंधे ठाणे, मुंबई आणि अयोध्येतील भूखंड खात सुटले आहेत. जसा आदर्श घोटाळा मुंबईत झाला होता तसाच एक घोटाळा अयोध्येत झाला आहे. सैन्य दलाची जमीन बिल्डर मंगलप्रभात लोढाच्या (Mangal Prabhat Lodha) घशात घातली आहे.
यासाठी तुम्हाला अयोध्येत राम मंदिर हवे होते का? कारसेवकांचे रक्त लोढाचा टॉवर बांधण्यासाठी सांडवले का?”असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले. “अयोध्येची जमीन लोढा, योगगुरू रामदेव बाबा खातो आणि आम्ही फक्त जय श्रीरामच्या घोषणा देतो. आम्हाला भाजपामुक्त राम पाहिजे होता आणि अयोध्यावासी यांनी भाजपामुक्त राम करून दाखवला”, अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली.
यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला.
छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे याचं वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत.
तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही.
‘लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही?
असं म्हणत मातोश्री बाहेर मुस्लिम समाजानं आंदोलनही केलं. भगवं सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार आहे.
ही सुरुवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना विसरलात,
जनता तुम्हाला माफ करणार नाही”, अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी