Maratha Reservatio Andolan | मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली; आरक्षणावर भूमिका विचारताच म्हणाले…

Sharad Pawar-Maratha Reservatio

सोलापूर : Maratha Reservatio Andolan | राज्यात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून देखील राज्याचा दौरा केला जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात (Maharashtra Assembly Election 2024) उतरण्याची देखील तयारी सुरू आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Caste Certificate) देऊन ओबीसी प्रवर्गातून (OBC Quota) आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्या या मागणीसाठी तसेच राज्यात बिघडलेली सामाजिक परिस्थिती पाहाता त्यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली देखील काढली आहे.

सरकारने आमच्या मागण्या मान्य केला नाहीत, तर विधानसभेला तुमचे सर्व आमदार पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नेत्यांचे राज्यात दौरे सुरू असताना त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर मराठा आंदोलकांकडून सुपाऱ्या फेकण्यात आल्या. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली.

तर आज शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांची गाडी रोखून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी देखील केली. हा प्रकार शरद पवार बार्शी दौऱ्यावर असताना टेंभूर्णी-कुर्डुवाडी रस्त्यावर घडला. यावेळी मराठा आंदोलकांनी शरद पवार यांना आपली आरक्षणावर भूमिका काय? असा प्रश्न केला.

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केल्यानंतर.
शरद पवारांनी गाडी थांबवून कारचा दरवाजा उघडला.
त्यानंतर आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत ‘माझा आरक्षणाला पाठींबा आहे’, असेही शरद पवार म्हणाले.

त्यानंतर आंदोलकांनी तुम्ही पाठिंबा आहे असं म्हणता पण भूमिका स्पष्ट करत नाही असेही पवारांना सुनावले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली.
यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा देखील दिल्या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed