Jitendra Awhad On Ajit Pawar | “अजित पवार हे जातीयवादी…” जुन्या सहकाऱ्याचा गंभीर आरोप; म्हणाले – “ते मागासवर्गीयांच्या तरतुदींना कात्री लावायचे”

Ajit-Pawar

पुणे : Jitendra Awhad On Ajit Pawar | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ‘अजित पवार यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची स्तुती केली होती.

राज ठाकरे म्हणाले होते की, मी अजित पवारांबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते पूर्वी शरद पवारांबरोबर (Sharad Pawar) होते, पवारांचं जातीचं राजकारण चालू होतं. जेम्स लेन वगैरे प्रकरण चालू होतं, मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की अजित पवार हे कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत आणि ही गोष्ट निश्चित आहे,” असे राज ठाकरे म्हणाले होते.

तर “अजित पवार हे पक्के जातीयवादी आहेत, मी स्वतः त्यांना कित्येकदा जातीयवाद करताना पाहिलं आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “अजित पवार अर्थमंत्री असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गांसाठी केलेल्या तरतुदींना कात्री का लावायचे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

आव्हाड म्हणाले, अजित पवार किती जातीयवादी आहेत हे मी जवळून पाहिलं आहे.
अर्थसंकल्पात ते नेहमी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी तसेच इतर मागासवर्गांसाठी असलेल्या तरतुदींना कात्री लावायचे.
अजित पवार हे खूप महान आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बोलू शकतात.
त्यामुळे त्यांना महानच म्हणावं लागेल. ते कोणालाही काहीही बोलू शकतात,असेही आव्हाड उपरोधिकपणे म्हणाले.

बारामती येथे त्यांनी केलेलं भाषण विसरता येणार नाही. यावेळी आव्हाड यांनी अजित पवारांच्या आवाजात (मिमिक्री करत) एक वक्तव्य केलं.
‘मला माहिती नाही या माणसाचं शेवटचं भाषण कधी होणार’, हे अजित पवारांचं वक्तव्य आव्हाडांनी बोलून दाखवलं.
तसेच अजित पवारांचं हे वक्तव्य योग्य होतं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आव्हाड यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर एक पोस्ट केली होती.
यामध्ये म्हटलं होतं, ‘माझे कितीही मतभेद असतील,
पण अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाहीत- राज ठाकरे.. हे दोघे पक्के जातीवादी,
उंदराला मांजर साक्ष.’ असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

You may have missed