Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

parvati police station

पुणे : चोरीच्या गुन्ह्यात अटक (Arrest In Theft Case) केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना एका आरोपीचा मृत्यु झाला. (Death In Police Custody)

सचिन अशोक गायकवाड Sachin Ashok Gaikwad (वय ४७, रा. मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी सांगितले की, पर्वती पोलीस ठाण्यातील (Parvati Police Station) पोलिसांनी सचिन अशोक गायकवाड आणि मनोहर रमेश माने Manohar Ramesh Mane (वय ३६, रा. मुंढवा) यांना चोरीच्या गुन्ह्यात ७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अटक केली होती. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना विश्रामबाग पोलीस कोठडीत (Vishrambaug Police Lockup) ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी त्यांना न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. दोघांना विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.

तेथे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सचिन गायकवाड याला चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेण्यात आले. तेथे आयसीयूमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. मेंदूत रक्तत्राव झाल्याने त्याला हा त्रास होत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्यावर साडेबारा वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला हा त्रास पूर्वीपासून होता. त्याची नातेवाईकांना माहिती होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती.
ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यु झाला.
आरोपीचा कोठडीत असताना मृत्यु झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे Criminal Investigation Department Maharashtra State (CID Maharashtra) सोपविण्यात आला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

You may have missed