All India Station Masters Association (AISMA) | पुणे विभागातील स्टेशन मास्तरांचे पुणे स्टेशन विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Video)
पुणे : All India Station Masters Association (AISMA) | रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्या संदर्भात रेल्वेच्या देशभरातील स्टेशन मास्तरांचा पॉवर डे सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी देशभरातील ६८ रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर होत आहे.
या आंदोलनात रेल्वेचे सर्व विभागातील स्टेशनमास्तर सहभागी झाले. दरम्यान पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर स्टेशन मास्तरांचे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या वतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
ट्रेन ऑपरेशन मध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्टेशन मास्टर कॅडर मध्ये रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. दुहेरी मार्गावरील सर्व स्थानकावर अतिरिक्त स्टेशन मास्तरांची नियुक्ती करण्यात यावी.
अंतर विभागीय “विनंती बदली” प्रक्रियेत पारदर्शकता असावी. लोणावळा ते दौंड विभागात सहा तासाच्या रोस्टरसाठी “जॉब अनालिसिस” करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातील सर्व मोठ्या स्थानकावर सुपरवायझर स्टेशन मास्टरची नियुक्ती करण्यात यावी. स्टेशन मास्तरांच्या बदल्या करताना त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सर्व स्थानकावर आर ओ वॉटर पुरिफायर ची तरतूद करावी.
सर्व स्थानकावर विश्रांती कक्ष सुविधाची तरतूद करावी. महिला स्टेशन मास्टर साठी चेंजिंग रूमची उभारणी करण्यात यावी. यासह विविध मागण्यासाठी देशभरातील ६८ विभागीय कार्यालयावर हे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, सेक्रेटरी जनरल – डी एस अरोरा, झोनल सचिव अजय सिन्हा, पुणे विभागीय अध्यक्ष कृष्ण मुरारी, सचिव पुरुषोत्तम सिंह, ऑर्गनसिंग सेक्रेटरी अमित कुमार, स्टेशन मास्टर प्रल्हाद कुमार , दिनेश कांबळे यांच्यासह स्टेशन मास्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
धनंजय चंद्राते म्हणाले, दिवस रात्र वेगवेगळ्या संकटावर मात करत स्टेशन मास्तर रेल्वे स्टेशनवर काम करत असतात. रात्र पाळी करून देखील त्याचा भत्ता मिळत नाही, सुरक्षा भत्ता दिला जात नाही. लढल्या शिवाय कोणती गोष्ट मिळत नाही त्यामुळे आगामी काळात देखील आपल्या मागण्या जोरदारपणे मांडव्या लागतील. जे आपल्या हक्काचे आहे ते आम्ही हक्काने मिळवून घेणार. (All India Station Masters Association (AISMA))
महिला कर्मचारी यांच्यासाठी वेगळे बाथरूम आणि चेंजिंग रूम असणे आवश्यक आहे.
विनोद नायर म्हणाले, अस्मा संघटना माध्यमातून आपल्या हक्कंसाठी आम्ही लढत आहे.
सेफ्टी ड्राईव्हसाठी आम्ही सर्वात प्रथम पाऊल उचलले.
सेफ्टी ड्राईव्हसाठी सध्या दबाव टाकला जात आहे. त्याची भीती वाटू लागली तर चूक होऊ शकतील.
कोणताही अपघात घडू नये यासाठी स्टेशन मास्तर काळजी घेत असतात.
स्टेशन मास्तर राकेश कुमार म्हणाले, गाड्या वाढत आहे पण स्टेशन मास्तर संख्या वाढत नाही.
प्रत्येक स्टेशनवर दोन तरी किमान स्टेशन मास्तर असावे.
स्टेशन मास्तर यांना मारहाण घटना घडतात त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
संघटना एकत्रित असणे गरजेचे आहे. कामाचा भार वाढून देखील भत्ते वाढत नाही.
आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अनेकजण मुदतपूर्व निवृत्ती घेत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु