MLA Ram Shinde – Gangster Nilesh Ghaiwal | कुख्यात गुंड निलेश घायवळसह भाजप आमदार देवदर्शनाला; व्हिडिओ व्हायरल, विरोधकांच्या हातात आयतं कोलीत

MLA Ram Shinde - Gangster Nilesh Ghaiwal

जामखेड : MLA Ram Shinde – Gangster Nilesh Ghaiwal | कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नागपंचमी निमित्ताने जामखेडच्या नागेश्वराची यात्रा (Nageshwar Yatra Jamkhed) असते.

या यात्रेत गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे एकत्रित दिसून येत आहेत. निलेश घायवळवर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात (Pune Rural Police) अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता चर्चा सुरु आहेत. यामुळे विरोधकांना महायुतीवर (Mahayuti) पुन्हा टीका करण्यास आयतं कोलीत मिळाले आहे.

मागेच निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट केला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ‘एक्स’ या समाजमाध्यमावर निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरतानाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रिल्स तयार करतो, त्याच्या सोबत इतर गुंड देखील आहेत. हे कशी काय एवढी हिंमत करतात? मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो हे कसं काय शक्य होतंय? गुंडांना सोबत घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना लागत आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा थराराचा पुण्यात इतिहास असून दोन्ही टोळ्यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी पुण्यात अनेक कारनामे केले आहेत. कधीकाळी गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे एकमेकांचे साथीदार होते. एकमेकांनी एकत्र मिळून गुन्हे घडवले होते. यात दोघांना शिक्षा देखील झाली होती.

जेलमधून बाहेर आल्यानंतर गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात वाद होऊन दोघांची फाटाफूट झाली.
निलेश घायवळवर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे चौदा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, खून, खूनाचा प्रयत्न असे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. (MLA Ram Shinde – Gangster Nilesh Ghaiwal)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed