Pune Police Tadipari Action | पोलीस उपायुक्त आर राजा यांनी एकाच दिवशी 8 सराईत गुन्हेगार पुण्यातून तडीपार
पुणे : Pune Police Tadipari Action | शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांनी एकाच दिवशी ८ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या वर्षी परिमंडळ ५ मधील ५३ गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे.
त्यामध्ये हडपसर पोलीस ठाणे (Hadapsar Police Station) १, मुंढवा पोलीस ठाणे (Mundhwa Police Station) ४, बिबवेवाडी पोलीस ठाणे (Bibvewadi Police Station) २, मार्केटयार्ड पोलीस ठाणे (Market Yard Police Station) १ अशा ८ गुन्हेगारांचा समावेश आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हेगार – आनंद चिंतामणी गायकवाड (वय ५३, रा. आनंद निवास, कामगार मैदान, मुंढवा) – २ वर्षे, शांताबाई यल्लप्पा कट्टीमणी (वय ५२, रा. बालाजीनगर, घोरपडीगाव) एक वर्षे, अतिश सुरज बाटुंगे/ तामचिकर (वय २५, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) -२ वर्षे, बापू अशोक जाधव (वय ४७, रा. साडेसतरानळी रोड, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) ६ महिने तडीपार करण्यात आले आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाणे – विजय सिद्धप्पा कटीमणी (रा. झांबरेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी)
– २ वर्षे, कन्या अभिमन्यु राठोड (वय ३५, रा. गव्हाणेवस्ती, गंगाधाम रोड, बिबवेवाडी) एक वर्षे.
मार्केटयार्ड पोलीस ठाणे – दिलेर अन्वर खान (वय ३४, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) १ वर्षे.
हडपसर पोलीस ठाणे – रवी मारुती चक्के (वय ३०, रा. साडेसतरानळी, दांगट वस्ती, हडपसर) – २ वर्षे तडीपार करण्यात आले आहे.
हे गुन्हेगार तडीपार कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास
तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त आर राजा यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये