Pune PMC News | महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे सॉफ्टवेअर ‘सीएसआर’च्या माध्यमातून होणार अपग्रेड

PMC

मिळकत कराच्या नोंदींची सुरक्षितता आणि गोपनियतेबाबत विशेष काळजी घेणार – अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.

पुणे – Pune PMC News | महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे (PMC Property Tax Department) जुने सॉफ्टवेअर अपडेट केले जाणार आहे. महाप्रीत या संस्थेच्या माध्यमातून हे अपग्रेडेशनचे काम हाती घेतले जाणार असून यासाठी येणारा खर्च आयसीआयसीआय बँक सीएसआरच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P) यांनी दिली.

महापालिकेच्या मिळकत कर विभागातील संगणकावर महाप्रीत या शासन स्थापित कंपनीचे कर्मचारी काम करताना आढळून आल्याने आज दिवसभर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. महापालिका मिळकत कर विभागाचे खाजगीकरण करणार येथ पासून महत्वाच्या आणि सर्वात मोठ्या उत्पन्नाच्या सोर्सच्या चाव्या खाजगी संस्थेच्या ताब्यात जाणार अशी शंका कर्मचारीच उपस्थित करत होते.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले मिळकत कर विभागाचे सॉफ्टवेअर हे २००८ मध्ये विकसित करण्यात आले होते. या सॉफ्टवेअरवरील डाटा हाताळणे तांत्रिकदृष्टया अडचणीचा आहे. हे सॉफ्टवेअर अधिक सुरक्षित आणि हाताळणीस अधिक सोपे व्हावे यासाठी ते अपग्रेड करण्यात येणार आहे. यासाठी आयसीआयसीआय बँकेने सीएसआरच्या माध्यमातून निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. महाप्रीत या शासन स्थापित कंपनीकडे यापुर्वीपासूनच महापालिकेची तांत्रिक आणि मिळकत कर विभागाशी निगडीत कामे सुरू आहेत. बँकेने देखिल याच कंपनीकडे हे काम देण्याचा निर्णय घेतला असून सध्याचे सॉफ्टवेअर कसे आहे आणि त्याचे अपगे्रेडेशन कसे करावे लागेल, याची माहिती घेण्याचे काम महाप्रीत कडून सुरू आहे. महापालिका या कामासाठी ट्रायपार्टी एमओयू करणार असून मिळकत कराचे रेकॉर्डची सुरक्षितता आणि गोपनियतेशी कुठलिही तडजोड केली जात नाही आणि जाणार नाही. यासाठी महापालिकेचे तज्ञ अधिकारी देखिल या कामावर देखरेख ठेवतील, असे पृथ्वीराज बी.पी.यांनी स्पष्ट केले. (Pune PMC News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed