Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात; म्हणाले – ‘सहानुभूतीचा विषय संपला, दिल्लीत गेले तरी…’

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray

मुंबई : Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरून चर्चा सुरु आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तीन दिवसीय दिल्ली दौरा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा यासाठी दिल्ली दौरे करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

मविआ या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देता निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून होत असलेली चर्चा यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत दिल्लीत जाऊन शिक्कामोर्तब करून घ्यावं याची गरज का वाटली?. लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची समाधानकारक कामगिरी नव्हती. त्यांचेही समाधान झाले नसेल. त्यांच्या चूका काय झाल्या याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. जर आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू. उमेदवारी निवडीबाबत काय चूका झाल्या वैगेरे.

त्यामुळे पुन्हा सावरण्यासाठी ते दिल्लीत गेले होते का, मला आश्चर्य वाटलं. कारण ती जे मागणी करतायेत ती होणार नाही असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंच्या चेहरा मविआकडून मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्यावर स्पष्ट मत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा काँग्रेसने महाराष्ट्रच नाही तर इतर ठिकाणीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नाही. ही परंपरा नाही. मुख्यमंत्री जर स्वतः निवडणुकीत उतरले तर सामान्यतः त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाते. मग अशोक गहलोत, कमलनाथ होते तेव्हा झाले.

पण विरोधी पक्षात असताना अपवाद वगळता चेहरा दिला नाही ही परंपरा आहे. निवडणूक झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष जो असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते सरकारच्या स्थैर्यासाठी महत्त्वाचा असतो. यावेळी बदल करायचं काही कारण वाटत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतची मागणी काँग्रेस पक्षात कुणी मान्य करणार नाही.
त्याने आम्हाला काय फायदा मिळेल असं वाटत नाही. जो काही सहानुभूतीचा विषय होता तो आता संपला आहे.
त्यातून किती फायदा झाला हे माहिती नाही. परंतु आता ज्या आमदारांनी पक्षांतर केले,
ज्यांच्यावर खोक्यांचा आरोप झाला त्यांच्याबद्दल राग आहे. त्यांचे मतदार त्यांना विचारणार. (Prithviraj Chavan On Uddhav Thackeray)

आम्ही विश्वासाने तुम्हाला मत दिले, तुम्हाला आमदार केले आणि तुम्ही आमच्या विश्वासाचा सौदा केला
याचे उत्तर त्या आमदारांना द्यावा लागेल. लोकसभेला हा मुद्दा नव्हता
परंतु विधानसभेत वैयक्तिक आमदारांबद्दल प्रश्न निर्माण होणार आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा मुद्दा कधी नव्हता. काँग्रेस कधीच त्याला मान्यता देणार नाही.
मागणी करायला हरकत नाही पण ते होणार नाही.
लोकसभा निकालाच्या कामगिरीनंतर अशाप्रकारची मागणी करणेच आश्चर्यकारक आहे.
का केली हे माहिती नाही. जागावाटपात एखादी जागा मागेपुढे होऊ शकते.

एखाद्याचा आग्रह असतो, मागणी असते. लोकसभेला हट्टाने त्यांनी काही जागा मागून घेतल्या होत्या.
यावेळी जागावाटपात फार मोठा फरक पडणार नाही.
४८ जागांमध्ये मोठा फरक दिसला परंतु २८८ जागांमध्ये फार फरक दिसेल असं वाटत नाही.
काही जागांवर तडजोड होऊ होऊ शकेल. एखाद्या जागेवर दिल्ल्लीत जाऊन कुणी हट्ट पूर्ण करू शकेल.
सत्ता येताना आपल्याला दिसतेय. त्यामुळे भरल्या ताटाला कोणी लाथ मारेल असं वाटत नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed